४५ वर्षावरील लसीकरणाला दुसऱ्या दिवशी प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST2021-04-03T04:32:22+5:302021-04-03T04:32:22+5:30

धुळे : जिल्ह्यात ४५ वर्षावरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी मात्र ज्येष्ठ नागरिकांचा अल्प ...

Response to vaccination over 45 years on the second day | ४५ वर्षावरील लसीकरणाला दुसऱ्या दिवशी प्रतिसाद

४५ वर्षावरील लसीकरणाला दुसऱ्या दिवशी प्रतिसाद

धुळे : जिल्ह्यात ४५ वर्षावरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी लसीकरणाच्या पहिल्या दिवशी मात्र ज्येष्ठ नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी ४ हजार ६०३ नागरिकांनी लस घेतली. लसीकरणाचे २१ केंद्र वाढवण्यात आली असून टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्रांमध्ये वाढ होणार आहे.

४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण गुरुवारपासून सुरु झाले आहे. गुरुवारी १ हजार १७४ नागरिकांनी लस घेतली होती. कोविशिल्ड लसीचे ३३ हजार डोस आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या सात लाखांपेक्षा जास्त असल्याने आणखी ९२ लसीकरण केंद्र वाढवण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २१ केंद्र वाढवण्यात आली असून आणखी १९ केंद्र आठवडाभरात वाढवण्यात येतील अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

शुक्रवारी ४५ ते ६० या वयोगटातील ३ हजार ९०९ व ६० वर्षावरील ६९४ नागरिकांनी लस घेतली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी मात्र लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला होता. एकूण १ हजार ३८६ नागरिकांनी लस घेतली होती. त्यात, ४५ ते ६० या वयोगटातील ७८५ व ६० वर्षावरील ३८९ जेष्ठ नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

गुरुवारी यामुळे कमी झाले लसीकरण-

गुरुवारी कोविशिल्ड लसीचे ३३ हजार डोस आरोग्य विभागाला प्राप्त झाले. मात्र दुपारनंतर डोस प्राप्त झाले होते. तसेच आरोग्य केंद्रांवर साठा कमी होता. जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर सध्या लसीकरण सुरु आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढल्यानंतर लसीकरणात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Response to vaccination over 45 years on the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.