स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:07 IST2020-03-16T12:07:04+5:302020-03-16T12:07:30+5:30
शिरपूर : पटेल फॉर्मसी कॉलेजमध्ये उपक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील एच.आर.पटेल औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रायोजित ८ दिवसीय स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळा पार पडली.
दरवर्षीप्रमाणे विद्यार्थी विकास विभागातर्फे युवती सभा कार्यक्रमाअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी. बारी यांच्याहस्ते व कराटे प्रशिक्षक जयसिंग पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.झेड.जी. खान यांनी शिबीराचे ध्येय व उद्दिष्टये सहभागी विद्यार्थिनींना सांगितले.
कराटे प्रशिक्षक जयसिंग पाडवी यांनी ८ दिवसीय कार्यशाळेत प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या बी.फार्मसीच्या मुलींना इस्टमिडल किक, सनब्लॉक, फॉदर किक, क्रॉस पंच इत्यादी प्रकारात कराटेचे धडे दिले. समारोपप्रसंगी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
तसेच कराटे प्रात्यक्षिके सादर करून आठ दिवसीय शिबीरातून घेतलेले ज्ञान व त्याच्या कृतीत झालेला बदल प्रदर्शित केला.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.झेड.जी. खान व शिबीर समन्वयस्क वाय.बी.ठाकूर यांनी परिश्रम घेतले.