दारुबंदीसाठी सतत लढा देणाया  महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 22:01 IST2019-07-26T22:01:38+5:302019-07-26T22:01:57+5:30

शिंदखेडा : महाराष्ट दारुबंदी युवा मोर्चा संघटनेतर्फे शिबिराचे आयोजन

Respect for women who are constantly fighting for alcoholism | दारुबंदीसाठी सतत लढा देणाया  महिलांचा सत्कार

शिबिरात मार्गदर्शन करतांना गिंताजली कोळी सोबत डॉ़सुजाता आडे,मालुताई पाटील,प्रल्हाद पाटील व उपस्थित महिला

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमठाणे : दारुबंदीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाने वर्धापन दिनानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे येथे महिलांसाठी व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात संघटनेतर्फे जिल्ह्यात दारुबंदीसाठी सतत लढा देणाºया महिलांचा सत्कारसुद्धा करण्यात आला.  
धुळ्यात २३ जुलै २०१७ साली संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी युवा मोर्चाची  स्थापना करण्यात आली होती.  त्याला दोन वर्ष पूर्ण झाल्याने शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे संघटनेतर्फे व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमास   प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सुजाता आडे, महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा प्रमुख गीतांजली कोळी, आदिवासी ओबीसी महिला प्रदेश अध्यक्ष मालुताई पाटील, उपसरपंच प्रल्हाद पाटील, विनायक पाटील, शांतीलाल मोरे, रमेश पाटील, पावबा सोनवणे, भरत मोरे उपस्थित होते़ 
या कार्यक्रमात गीतांजली कोळी  म्हणाल्या की दारूच्या व्यसनामूळे अनेक घरांचा संसार उध्वस्त झाला. या गोष्टी बंद करायच्या असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी, व व्यसन मुक्ती झाली पाहीजे. युवा मोर्चाने आतापर्यंत  गावसह खेडोपाडी दारूबंदीची मोहीम यशस्वी केली असून दारूचे अड्डे उध्वस्त केले. त्यात स्थानिक महिला व पोलीस प्रशासनाचा मोलाचा पाठिंबा लाभला असे देखील सांगितले़ 
कार्यक्रमाच्या औचित्याने व्यसन मुक्ती शिबिर देखील राबवण्यात येत आहे़ व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना मोफत डेमो देण्यात आला़ व्यसनावर उपाय म्हणून व्यसनमुक्ती साठी  स्प्रे च्या साहाय्याने उपाय केला गेला. पोटाला आणि चेहºयावर स्प्रे  मारावा लागतो असे दहा दिवस केल्याने व्यसनापासून सुटका होऊ शकते या स्प्रेची बाजारात चार हजार रुपये किंमत आहे़ हा स्प्रे शिबिरात मोफत उपलब्ध करूण देण्यात आला आहे़व्यसन मुक्ती शिबिर ३० तारखेपर्यंत चालणार आहे. विडी ,सिगारेट, दारू, गुटखा, तंबाखू, असे कुठल्याही प्रकारचे व्यसन असेल अशा व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे़ गीतांजली कोळी यांच्या तर्फे कार्यक्रमाच्या औचित्याने दारूबंदी चळवळीत सहभागी तीस महिलांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला गावातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ 
कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चा प्रमुख गीतांजली कोळी यांनी केले आहे़

Web Title: Respect for women who are constantly fighting for alcoholism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे