ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:12+5:302021-06-09T04:44:12+5:30
साक्री ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विभागाने कोरोना काळातील रुग्णसेवेबद्दल डाॅ. श्रीकांत पाटील, समुपदेशक दत्तू हाके, प्रयोगशाळा सहायक गणेश पाटील, रूपाली ...

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार
साक्री ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विभागाने कोरोना काळातील रुग्णसेवेबद्दल डाॅ. श्रीकांत पाटील, समुपदेशक दत्तू हाके, प्रयोगशाळा सहायक गणेश पाटील, रूपाली देसले, सुषमा पाडवी, पौर्णिमा ठाकरे, करुणा आहिरे व संघमित्रा उगले, किशोर पाटील, हेमंत राठोड, सतीश देसले, रामसिंग नागलोद, अलका सूर्यवंशी, सुमनबाई अहिरे, दिलीप पाटील, गणेश पाटील, पायलट जयदीप निकम यांचा शाल, सेवा संघाचा विशेषांक व दिनदर्शिका देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्राचार्य बी. एम. भामरेंनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सचिन नांद्रे यांनी केले, तर आभार अनिल अहिरे यांनी मानले.