आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:35 IST2021-03-19T04:35:06+5:302021-03-19T04:35:06+5:30

रिक्त झालेल्या जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या जागांचे आरक्षण काढणे गरजेचे आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी ...

Reservations are likely to deprive many of opportunities | आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकण्याची शक्यता

आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकण्याची शक्यता

रिक्त झालेल्या जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी या जागांचे आरक्षण काढणे गरजेचे आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी सर्वसाधारण गटातील महिला आरक्षण सोडतीची तारीख जाहीर केलेली आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या १५ पैकी ८ गट व पंचायत समितीच्या ३० पैकी १६गण हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

धुळे तालुक्यातील ११ गटांमधील ज्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले हाेते. त्यात सहा पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. आता तालुक्यातील सहा जागा या महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील चार पैकी दोन जागा या महिलांसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. शिंदखेडा तालुक्यात चार पैकी ३ जागांवर महिला सदस्यांचा विजय झालेला होता.

दरम्यान खरी कसोटी पंचायत समितीच्या गणांमध्ये लागणार आहे. कारण धुळे तालुक्यातील ८ पैकी चार, साक्रीतील ९ पैकी ५, शिंदखेड्यातील ५ पैकी ३, व शिरपूरमधील ८ पैकी चार जागा या महिलांसाठी जागा राखीव असतील.

गट-गणांचे आरक्षण बदलेलले तरी त्याचा फटका सदस्यांना बसू शकतो अशी चिन्हे आहेत. कारण सदस्यत्व रद्द झाल्याबरोबर काही सदस्यांनी पोटनिवडणुकीच्यादृष्टीनेही तयारी सुरू केली होती. गट-गणातील अनेकजागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे अनेकांची संधी हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.

Web Title: Reservations are likely to deprive many of opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.