एकाच दिवशी ४४ जणांचे अहवाल बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:53 IST2020-12-23T21:53:22+5:302020-12-23T21:53:40+5:30
धुळे : जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मंगळवारी ४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ ...

dhule
धुळे : जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार मंगळवारी ४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार ३५४ वर येवून पोहचली आहे.
जिल्हा रुग्णालयातील ११० अहवालांपैकी ३४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. यामध्ये धुळे शहरातील यशवंत छात्रालय १, आदर्श छात्रालय १, वानखेडकर नगर १, देवपूर २, पाथर्डी १, राजेंद्र छात्रालय १, पोलीस हेडकॉटर १, शास्त्रीनगर १, पागे अहिरे छात्रालय रावेर १, मिशन कंपाउंड मोगलाई १, नालंदा १, कापडणे १, कावठी १, धुळे इतर ३, बोरीस २, काकासाहेब छात्रालय ३, नकाने रोड १, बिलाडी १, आनंद नगर २, फुले कॉलनी १, नगर पट्टी १, जय हिंद कॉलनी १, मुकटी २, साक्री रोड १, नवरंग कॉलनी १, अक्कलपाडा एकाचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा- येथील २८ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. शिंदखेडा १, जोगशेलू शिंदखेडा १, नंदुरबार (वैनदाने, कोपर्ली) दोघांचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय शिरपूर- येथील २० अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. लोंढरे १, बोराडी १, भाडणे साक्री मधील ४३ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
मनपा रॅपिड अँटीजन टेस्ट- १६९ अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ७ अहवालांपैकी ३ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. धुळे ३, चाळीसगाव १, खाजगी लॅब मधील ४ अहवालापैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. अशोक नगर ; धुळे २, गरीब नवाज नगर, धुळे एकाचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.