Report a crime in the statue irony case | पुतळा विटंबना प्रकरणी गुन्हा नोंदवा
पुतळा विटंबना प्रकरणी गुन्हा नोंदवा

धुळे : जेएनयू विद्यापीठात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणातील संशयितांवर कारवाई करत असतानाच त्यांना विद्यापीठातूनही निलंबित करा, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवाराबाहेर शुक्रवारी निदर्शने केली़ 
गेल्या ७० वर्र्षांपासून शैक्षणिक आणि सामाजिक विषयात योगदान देणाºया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कामकाज अद्याप सुरु आहे़ गुरुवारी जेएनयू विद्यापीठात युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची कोणीतरी विटंबना केल्याची घटना घडली आहे़ पुतळ्याची विटंबना करणाºयामध्ये काही देशद्रोही समाजकंटकांचा समावेश आहे़ 
या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा़ संबंधितांचा शोध घेऊन त्यांना विद्यापीठ      परिसरातून निलंबित करण्यात यावे़ तसेच या घटनेमागील सूत्रधार असणाºया अधिकाºयांवर देखील लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी़ अशी मागणी अखिल विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे़ अन्यथा, विद्यार्थी परिषदेच्यावतीने या विषयावर देशभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आणि त्यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे़ 
प्रशासनाला निवेदन सादर करताना निलेश गिळे, अमोल मराठे, विजय पंचारिया, आदिनाथ कोठावदे, प्रसाद महाले, अजय वाघ, स्वप्निल पाटील, गंगाधर कोलमवार, शुभम देव आदी सहभागी होते़ 

Web Title: Report a crime in the statue irony case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.