गावांना जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:06 IST2019-11-05T23:06:18+5:302019-11-05T23:06:59+5:30
तिसगाव : पुलावरुन पाणी वाहिल्यास तुटतो संपर्क, संरक्षण कठडे नसल्याने धोकेदायक

dhule
तिसगाव : धुळे तालुक्यातील तिसगाव ते ढंडाने या दोन गावांना जोडणाºया भात नदीवरील फरशी पुलाची पार दुरवस्था झाली आहे. पुरामुळे या पुलावरुन पाणी वाहत असल्यास या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. पुलावर संरक्षण कठडे नसल्याने येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
तिसगाव ते ढंडाने या गावांच्या मध्ये वन विभागातून उगम पावणारी भात नदी वाहते. सतत पाच महिने वाहणारी ही जिल्ह्यातील एकमेव नदी आहे. नगावहून ५ कि.मी. अंतरावर तिसगाव, ढंडाने गाव आहे. तेथून नदी ओलांडली की वडेल गाव आहे.
नगाव ते सायने दरम्यान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत दोन वर्षापूर्वीच रस्त्यांची कामे झाली आहे. लहान- मोठे नाल्यावर देखील सात ते आठ पुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, आणि तिसगाव ते ढंडाने या भात नदी काठावरील गावाच्या पुलाची पार दुरवस्था झालेली असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या गावातील भात नदीवर मोठा पुल का बांधण्यात येत नाही, असा प्रश्न तिसगाव, ढंडाने, वडेल येथील ग्रामस्थांना भेडसावत आहे.
दुसरीकडे याच भात नदीवर नगाव ते सायने रस्त्यावर मोठी वाहतूक नसताना सुद्धा तेथे मोठा पूल बांधण्यात आला आहे आणि तिसगाव ढंडाने व वडेल या गावांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे २५०० आहे. दोन्ही गावात शेकडो दुचाकीसह, लहान-मोठी वाहने आहेत. तरी देखील तिसगाव आणि वडेल गावालगतच्या पुलांचे काम होत नाही. पाऊस झाला की फरशी पुलावरुन पाणी वाहत असल्याने या दोन्ही बाजूच्या गावांचा संपर्क तुटतो.
या पाण्यामधून जर ये - जा करायची ठरविले तर या पुलाला संरक्षण कठडे देखील नाहीत त्यामुळे येथे मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घरी कसे जायचे, असा प्रश्न असतो. २५ ते ३० वर्षांपूर्वी या फरशीवजा पुलाचे बांधकाम झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आता ही फरशी इतकी जीर्ण झाली आहे की वाहून येणाºया पाण्याने काही भाग तुटला आहे. तर बाजूच्या भिंतीवर वड, पिंपळाची झाडे उगवली आहेत तर दुसºया बाजूने मोठा गाळ साचलेला आहे. पुरामुळे फरशीवजा पुलावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे.
लवकरात लवकर या पुलांचे काम सुरू व्हावे, अशी मागणी तिसगाव ढंडाने येथील विजय पाटील, दीपक पाटील, रविंद्र पाटील, शिवाजी आहिरे ,दिनेश भामरे, बापू भामरे, भीमा हटकर, लोटन हटकर, नितीन शिरसाठ, आबा कायखेडकर, खंडू कापडणे, सुजित भामरे यांच्यासह परिसरातील वाहनधारक व ग्रामस्थांनी केली आहे.