शिक्षक भारतीवरील निर्बंध हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 21:59 IST2020-07-12T21:59:35+5:302020-07-12T21:59:51+5:30
मागणी। डीटीएड व बीएड स्टुडंट असोसिएशनकडून निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : राज्यातील रखडलेली शिक्षक भरतीवरील निर्बंध हटवून प्रक्रिया पुन्हा सुरू करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी संजय यादव यांना डीटीएडबीएड स्टुडंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तुषार विजय शेटे यांनी दिले़
कोव्हीड १९ या संसर्गजन्य रोगामुळे अर्थव्यवस्थेवर परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याबाबत पदभरतीवर बंदी घालण्यात आली आहे़ त्याच अनुषंगाने शालेय शिक्षण विभागातील उपसचिव चारूशीला चौधरी यांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या खासगी, अल्पसंख्यांक, स्थानिक संस्था जसे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आदी सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अध्यापक या सर्व पदांवर निर्बंध लादले गेले़ मात्र पवित्र पोर्टल मार्फत करण्यात आलेली शिक्षक भरती गेल्या ३ वर्षापासून रखडलेली असून १२ हजार १४७ जागांपैकी ५ हजार ८०० जवळपास जागा भरण्यात आलेल्या आहेत़ परंतु सदर पत्रामुळे सध्या भरतीवर बंदी आहे़ यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला़