नियमबाह्य अतिक्रमण काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:06 IST2020-06-17T22:06:09+5:302020-06-17T22:06:50+5:30
मागणी : महापालिकेत मास्क लावून नागरिकांचा ठिय्या आंदोलन

dhule
धुळे : शहरातील रामरावदादा सोसायटी व गोकर्ण सोसायटी भागातील रस्त्यावर भिंत बांधल्याने वाहतूकीसाठी रस्ता बंद केला आहे़ येथील अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे़ यामागणीसाठी मंगळवारी परिसरातील नागरिकांनी महापालिकेत ठ्यिा आंदोलन केले़
रामरावदादा सोसायटी व गोकर्ण सोसायटी जोडणारा सहा मीटर रूंदीचा कायम वाहिवाट रस्ता आहे़ त्याठिकाणी श्रीमती ताराबाई रविंद्र सोनवणे यांचा प्लॉट क्रं.१५ व अन्य एका व्यक्तीने बांधकाम मजुरीच्या अटी शर्तीचे भंग करून भर रस्त्यावर भिंत व पोर्च बांधून दोन्ही सर्व्हेच्या बांधावर रस्ता कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केला आहे़ अकरा महिन्यापासून तक्रारी करूनही महापालिकेकडून कारवाई झालेली नाही़ रस्ता बंद झाल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण हो आहे़ तर याच ठिकाणी पाणी साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ तातडीने अतिक्रमण काढण्याच्या मागणसाठी मंगळवारी मनपात ठ्यिा आंदोलन करण्यात आले़ यावेळी नरेंद्र खैरनार, रविद्र भामरे, दिलीप पाटील, सुभाष मासुळे, सुरेखा भामरे, वैशाली मासुळे, कल्पना चौधरी, वंदना खैरनार, ललिता पाटील, कल्पना खैरनार, प्रिया महिवड, वैशाली पाटील, रंजना पाटील, सिमा शिंदे, रोहदास शिंदे आदी उपस्थित होते़