लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील गोताणे येथेल प्रियदर्शनी गृहनिर्माण महिला संस्था संचलित स्वस्त धान्य दुकानातर्फे गावातील पात्र लाभार्थींना मे महिन्याचा मोफत तांदूळ व डाळ वाटप करण्यात आले. थेट लाभ मिळाल्याने शासन व दुकानादाराबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शासनाच्या मोफत धान्य योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्याला मिळावा म्हणून स्वस्त धान्य दुकानदार, पुरवठा विभाग आणि लाभार्थी यांचा समन्वय साधुन नियोजन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहचत आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वसामान्य पात्र लाभार्थींना मदत म्हणून मोफत तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाउनमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्मण झाला असताना गोरगरीबांना दिलासा मिळाला आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तहसिलदार किशोर कदम, पुरवठा निरीक्षक सी. एस. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गोताणे येथे नुकताच स्वस्त धान्य दुकानातर्फे गावात मोफत धान्य वाटप सुरु आहे़ त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी कृऊबाचे संचालक अर्जून पाटील, माजी सरपंच भगवान पाटील, माजी उपसरपंच हिरालाल पाटील, ज्येष्ठ नेते धुडकू पाटील, युवा नेते प्रशांत गोमा पाटील, माजी उपसरपंच वसंत पाटील, सेवा सोसायटीचे व्हा.चेअरमन रमेश बागले, संचालक महारु पुंजाराम पाटील, हिंमत पाटील, आंनदा पाटील,दगडू पाटील, शिवाजी पाटील, सरदार पाटील, दाजभाऊ पाटील, भास्कर पाटील, भटू पाटील, गोरख रामदास पाटील, प्रकाश पाटील, जालिंदर पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरीक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मोफत तांदूळ, डाळ मिळाल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 22:08 IST