भगवंताच्या प्राप्तीसाठी संतसंगत मोलाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:11 IST2020-02-12T23:10:49+5:302020-02-12T23:11:12+5:30
गजानन महाराज प्रगट दिन : हभप माधव महाराज धानोरेकर यांचे किर्तन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त देवपूरातील गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे पालखी सोहळा उत्साहात झाला़ मंगळवारपासुन सुरू झालेल्या किर्तनाच्या कार्यक्रमात हभप श्री माधव महाराज धानोरेकर यांनी पहिले पुष्प गुंफतांना हरीप्राप्ती साठी काय करणे आवश्यक आहे हे सांगीतले़ परमात्मा हा कनवाळू आहे, कृपालु आहे, पण जीव लोभी आहे, आपणावर कृपा व्हावी असे वाटत असेल तर गजानन महाराजांसारख्या संतांचे पाय धरले पाहीजे़ याचबरोबर मुरणे या शब्दाचा अर्थ सांगीतला़ आंबा मुरल्यावर त्याचा रंग बदलतो, लोणचे मुरल्यावर त्याची चव बदलते, जैवीक घटक मुरल्यावर खत तयार होते, संतसंगात मुरल्यावर, नामसंकीर्तनात मुरल्यावर भगवंताची कृपा होत असते़
बुधवारी हभप कैलास महाराज चोपडाईकर यांचे किर्तन झाले़ किर्तनाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन गोपाळ केले यांनी केले होते़ किर्तनामुळे आध्यात्मिक वातावरण आहे़