ब्राह्मण समाज परिचय मेळाव्यात ६५० जणांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 21:54 IST2019-12-15T21:53:40+5:302019-12-15T21:54:05+5:30
पाच राज्यातून होती उपस्थिती

ब्राह्मण समाज परिचय मेळाव्यात ६५० जणांची नोंदणी
धुळे : हिंदी भाषिक ब्राह्मण समाजाचा परिचय मेळावा धुळ्यात पार पडला़ यात २४२ मुलींनी तर ४०८ मुलांनी नोंदणी केली होती़ प्रत्यक्षात मात्र मोजक्याच मुलां-मुलींची मेळाव्यात उपस्थिती होती़ त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला थोडक्यात परिचय करुन दिला़
ब्राह्मण युनिटी हिंदी भाषिक सर्व शाखेय उपवर आणि वधुंचा परिचय मेळावा शहरातील देवपूर भागात प्रोफेसर कॉलनीतील मनकर्णिका भवनात रविवारी पार पडला़ यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण तिवारी, सुनिता तिवारी, हिंदी भाषिक राष्ट्रीय अध्यक्ष अजय पांडे, युवा प्रमुख अनिल दीक्षित यांच्यासह श्री शुक्ल यजुर्वेदीय गोवर्धन ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष महेश मुळे, भूषण जोशी, दुर्गाचरण शर्मा, शिवप्रसाद शर्मा, प्रीतम पाठक, पी़ ए़ कुलकर्णी, रविंद्र कुलकर्णी, राजू पंडीत, सचिन शर्मा, विनोद मोराणकर आदी उपस्थित होते़ वधू-वरांचे परिचय मेळावे घेणे किती गरजेचे आहे़, त्यातून वेळेची आणि पैशांची बचत होत असल्याचेही सांगण्यात आले़
मान्यवरांच्या मनोगतानंतर उपस्थित उपवर-वधूंच्या परिचय मेळाव्याला सुरुवात झाली़