संदर्भांचा योग्य ठिकाणी वापर होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST2021-07-30T04:37:40+5:302021-07-30T04:37:40+5:30
साक्री येथील विमलबाई पाटील कला व कै.डॉ. बी. एस. देसले विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत आयोजित ऑनलाईन वेबिनार प्रसंगी ‘साहित्याचा ...

संदर्भांचा योग्य ठिकाणी वापर होणे गरजेचे
साक्री येथील विमलबाई पाटील कला व कै.डॉ. बी. एस. देसले विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागामार्फत आयोजित ऑनलाईन वेबिनार प्रसंगी ‘साहित्याचा समाज व संस्कृती यातील अनुबंध’ या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. मंगला देसले, प्राचार्या डॉ. राजश्री कदम, संस्थाध्यक्षा मृणाल देसले, डॉ. अजिंक्य देसले, डॉ. श्रुतिका देसले, प्राचार्य डॉ. पी. एस. सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य वक्त्या प्राचार्या डॉ. कदम म्हणाल्या, समाजाची विशिष्ट काळासाठीची जीवनपद्धती असते. म्हणून समाजाची बांधणी महत्त्वाची असते, समाज बदलला तर साहित्याचे रूप बदलते. म्हणून संतांनी आपल्या साहित्यातून तत्कालीन दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, महानगरीय साहित्याचा समाजजीवनाशी येणारा अनुबंध विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केला.
अध्यक्ष प्राचार्य, डॉ.पी.एस. सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन समन्वयक डॉ. कैलास वाघ यांनी केले. तर आभार संयोजिका डॉ. वसुमती पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.