आठवड्याभरात मालमत्ता कराची ५० लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:21 IST2019-04-09T22:20:27+5:302019-04-09T22:21:10+5:30

महापालिका : नव्या आर्थिक वर्षात मालमत्ता करात १० टक्के सवलतीचा लाभ

 Recovery of property tax of 50 lakhs in a week | आठवड्याभरात मालमत्ता कराची ५० लाखांची वसुली

dhule

धुळे : महापालिकेतर्फे थकीत मालमत्त्ता कराच्या वसुलीसाठी शास्ती माफीची अभय योजना लागू केली होती़ यात मार्चअखरेपर्यत २६ कोटी ७३ लाख रूपये कर जमा झाला होता़ मार्चअखेर संपल्यानंतर देखील करदात्यांचा कर भरण्यासाठी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे २ ते १० एप्रिल दरम्यान सुमारे ५० लाख रूपये मालमत्ता कराची रक्कम जमा झाली आहे़
मालमत्ता करात सवलतीसाठी महापालिका प्रशासनाकडून फेब्रुवारी ते मार्च महिन्यात तीन टप्प्यांत सवलत दिली होती़ त्यानुसार मार्चअखेरपर्यत ६ कोटी ७३ लाख रूपये कराची रक्कम जमा झाली होती़

Web Title:  Recovery of property tax of 50 lakhs in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे