धुळे मनपाच्या मोहिमेतून 27 कोटींवर वसूली
By Admin | Updated: March 31, 2017 16:52 IST2017-03-31T16:52:27+5:302017-03-31T16:52:27+5:30
महापालिकेच्या वसुली विभागाने धडक मोहिम राबवून नियमित आणि थकबाकीदार यांच्यावर कारवाई करत 27 कोटींचा आकडा पार केला आहे अशी माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़
धुळे मनपाच्या मोहिमेतून 27 कोटींवर वसूली
धुळे, दि.31- महापालिकेच्या वसुली विभागाने धडक मोहिम राबवून नियमित आणि थकबाकीदार यांच्यावर कारवाई करत 27 कोटींचा आकडा पार केला आहे अशी माहिती आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली़ दरम्यान, शुक्रवार दुपार्पयत ही स्थिती असून एकूण थकबाकी 30 कोटी 46 लाखांची आह़े
ग्महापालिका प्रशासनाकडून केवळ ‘कराचा भरणा करा, जप्ती टाळा’ असे आवाहन केले जात होत़े पण अपेक्षित प्रमाणात त्याचा उपयोग होत नसल्याने आता कारवाईचे सत्र उपासण्याचे धोरण शेवटी आखण्यात आल़े त्यासाठी 11 मार्चपासून कारवाईचे सत्र अवलंबविण्यात आल़े कारवाई होण्याआधी थकबाकीदारांनी आपल्याकडील थकबाकी तातडीने महापालिकेकडे जमा करावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्यानंतर ब:याच जणांनी प्रतिसाद दिला़ ज्यांनी दिला नाही त्यांची मालमत्ता सील करण्यात आली होती़ तातडीने पैसे भरल्यानंतर त्यांचे सील काढण्यात आले होत़े थकबाकीदारांची संख्या लक्षात घेता 25 पथक वसुलीसाठी तैनात करण्यात आल़े 30 कोटी 46 लाखांपैकी शुक्रवारीर्पयत दुपार्पयत 27 कोटींवर टप्पा गाठण्यात आला आह़े सायंकाळी हा आकडा वाढणार आह़े