कोरोना संसर्ग व डेंग्यू निर्मुलनासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 22:05 IST2020-11-17T22:04:33+5:302020-11-17T22:05:04+5:30

चंद्रकांत सोनार कोरोनासारख्या महामारीपासून प्रत्येक धुळेकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आतापर्यत गेल्या सहा महिन्यात महानगरातील ९ कोटी ९० हजार ...

Ready for Corona Infection and Dengue Eradication | कोरोना संसर्ग व डेंग्यू निर्मुलनासाठी सज्ज

dhule

चंद्रकांत सोनार
कोरोनासारख्या महामारीपासून प्रत्येक धुळेकर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आतापर्यत गेल्या सहा महिन्यात महानगरातील ९ कोटी ९० हजार घरांचे निरजंतूकीकरण करण्यात आले आहे. तर शहरातील अकरा खाजगी व सरकारी विभागाचे देखील निरजंतूकीरण झाले आहे. सध्या हिवाळ्यात डेंग्यू व कोरोना संसर्ग अशा दोन आजाराना सामोरे जावे लागू शकते. सध्यातरी एकही नागरिकाला डेंग्यूची लागण झालेली नसली तरी आरोग्य विभागाकडून प्रभागनिहाय फवारणीचे काम सुरू आहे. अशी माहिती मनपाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा शहर मलेरिया पर्यवेक्षक लक्ष्मण पाटील यांनी लोकमत शी बोलतांना दिली.
प्रश्न : महानगरातील किती घरांचे सॅनेटराझर करण्यात आले
उत्तर: शहरात कोरोना बाधित आढळून आल्यानंतर सॅनेटराझर करण्याच्या सुचना होत्या. त्यानुसार पहिल्या टप्यात शहरातील ९० हजार तर दुसऱ्या टप्यात अकरा वेळा असे ९० कोटी ९० हजार घरांचे सॅनेटराझर आतापर्यत झालेले आहे. तसेच आरोग्य विभागाला बाधित कुटूंबाची माहिती देऊन बाधित परिसरात तपासणीसाठी सल्ला दिला जात होतो.
प्रश्न : महानगरातील किती सरकारी विभाग व खाजगी दवाखाने सील केलेत
उत्तर: मार्चनंतर आतापर्यत १३ हजार ६९८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. या कालावधीत मनपाचे पाच, टपाल विभागाचे एक, बीएसएनएल एक, एमएसइबी एक तसेच जिल्हा परिषद एक असे सहा विभागात कोरोना बाधित कर्मचारी आढळून आले होते. त्या ठिकाणी सॅनेटराझर करून २४ तासासाठी सील केले करण्यात आले होते. तर २५ खाजगी रूग्णालयांचा विभाग होते.
प्रश्न : डेंग्यू व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय उपाय योजना केल्या जात आहे.
उत्तर: हिवाळ्यात कोरोना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून योग्य दक्षता बाळगली जात आहे. सध्या पाच कर्मचारी कोरोना बाधितांवर अत्यविधी करण्यासाठी तर सॅनेटराझर करण्यासाठी २० असे कर्मचारी आहेत. १५ प्रभागात ॲबटिंग व फवारणी केले आहेत. शिवाय एकही व्यक्तीमध्ये डेंग्यूची रूग्ण आढळून आले आहे.
भिती बाळगू नका, मात्र खबरदारी घ्या
सहा महिन्यापासून आपण कोरोना काळात जगत आहोत. येणार्या काळातही जगावे लागणार आहे. त्यामुळे कोरोनाची भिती बाळगू नका, मात्र लागण होणार नाही. याची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यासाठी नियमित शासनाने दिलेल्या नियम व अटींचे तंतोतत पालन केल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो.
अनेकांचे मदतीचे हात पुढे येवू लागलेत.
पाच ते सहा महिन्यापुर्वी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची भिती होती. त्यामुळे कुटूंबातील एखादा सदस्य जरी मयत झाला तरी अंत्यसंस्कार करण्यासाठी नकार दिला जात होता. मात्र हळू-हळू नागरिकांमध्ये कोरोना विषयी भिती कमी झाल्याने अंत्यंसंस्कार करण्यासाठी नागरिकांसह विविध सामाजिक संस्स्था पुढे येवू लागल्या आहेत. मात्र खबरदारी देखील घेण्याची गरज लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

Web Title: Ready for Corona Infection and Dengue Eradication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.