रायवट व कानडामाना पाटचारी दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:03+5:302021-08-12T04:41:03+5:30
करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवा आमदार कुणाल पाटील यांच्या नेरच्या कार्यकर्त्यांसह अभियंत्यांच्या बैठकीत सूचना नेर : येथील रायवट व ...

रायवट व कानडामाना पाटचारी दुरुस्ती
करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवा
आमदार कुणाल पाटील यांच्या नेरच्या कार्यकर्त्यांसह अभियंत्यांच्या बैठकीत सूचना
नेर : येथील रायवट व कानडामाना पाटचारी तातडीने दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचवा, अशा सूचना आमदार कुणाल पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिल्या. यासाठी लवकरच आपण या पाटचारीची पाहणी करणार असल्याचे त्यांनी नेर येथील कार्यकर्त्यांना आश्वासन दिले.
नेर येथील रायवट व कानडामाना पाटचारी नादुरुस्त असल्याने त्यातून पाणी सोडण्यास अडचणी येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. म्हणून ही पाटचारी तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नेर येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे केली होती. याची दखल घेऊन आमदार कुणाल पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता ए.ओ. पवार, शाखा अभियंता जगदीश खैरनार यांना आणि नेरच कार्यकर्ते आनंद पाटील, मांगू मोरे, प्रकाश खलाने, आर.के. वाघ, दिलीप बिरारी, योगेश गवळे, आर. डी. माळी, शिवाजीराव देशमुख, पांडुरंग खलाणे, सुभाष बोढरे, तुळशीराम मोरे आदी बैठकीत उपस्थित होते.
त्यात या कार्यकर्त्यांनी पाटचारीच्या असलेल्या समस्या माडल्या. त्यावर आमदार कुणाल पाटील यांनी तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिल्या.
ग्रामीण रुग्णालयासाठीही दिला प्रस्ताव
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी नेर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी केली. तसेच विजेची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी १३२ केव्ही सबस्टेशनचीही मागणी केली. त्याचबरोबर नेर येथे भरणाऱ्या यात्रेच्या वाटेवर पाझंरा नदीवर फरशीपूल उभारून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याचीही मागणी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे केली. त्यावर ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव आधीच पाठवला असल्याची माहिती आमदार पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली. तसेच सबस्टेशन आणि फरशी पुलाचाही प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे आश्वासन दिले.