ट्रॅक्टर अपघातात रावेरचा तरुण ठार, दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST2021-05-06T04:38:33+5:302021-05-06T04:38:33+5:30

धुळे : भरधाव वेगातील ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात रावेर येथील एक तरुण जागीच ठार झाला, तर अन्य एक जखमी ...

Raver's young man killed, two seriously injured in tractor accident | ट्रॅक्टर अपघातात रावेरचा तरुण ठार, दोन गंभीर जखमी

ट्रॅक्टर अपघातात रावेरचा तरुण ठार, दोन गंभीर जखमी

धुळे : भरधाव वेगातील ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात रावेर येथील एक तरुण जागीच ठार झाला, तर अन्य एक जखमी झाला.

धुळे ते पाडळदे रस्त्यावर दह्याने ता.धुळे शिवारातील बारीवर सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमाराला हा अपघात झाला. ट्रॅक्टर चालक सुनील नाना कुवर रा.रावेर ता.धुळे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने आणि भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविल्यामुळे बारीतील उतारावर ट्रॅक्टर उलटले. या अपघातामध्ये एकनाथ देवानंद अहिरे (वय १८, रा.रावेर) हा तरुण जागीच ठार झाला, तर सचिन अशोक अहिरे (२२) आणि चालक सुनील नाना कुवर दोघे रा.रावेर हे गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी सचिन अशोक अहिरे याने दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सुनील नाना कुवर याच्याविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड काॅन्स्टेबल आर.यु. मोरे करीत आहेत.

Web Title: Raver's young man killed, two seriously injured in tractor accident