८० संस्थांना मिळाले मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 09:33 PM2019-11-09T21:33:38+5:302019-11-09T21:34:20+5:30

महापालिका : स्वच्छ सर्वेक्षणांंतर्गत विविध उपाययोजनांवर भर

 The rating was received by two organizations | ८० संस्थांना मिळाले मानांकन

dhule

Next

धुळे : स्वच्छ सर्वेक्षण २०१९-२० अंतर्गत मनपाकडून स्वच्छतेविषयक विविध उपक्रमांवर भर देण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार शाळा, महाविद्यालय, हॉटेल, हॉस्पिटल, बाजारपेठ अशा ८० संस्थांना महापालिकेकडून मांनाकन देण्यात आले़
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जून २०१९ पासून स्वच्छ सर्वेक्षण २०२० लीग सुरू करण्यात आली आहे. या लीगमध्ये शहराचे त्रैमासिक मूल्यांकन स्थान ठरविण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये मानांकन प्राप्त करणाऱ्या विविध संस्था, शाळा, हॉस्पिटल व विविध पातळीवरील यंत्रणा यांच्या प्रतिनिधीचा सन्मान केला जाणार आहे़ स्पर्धेत शहरातील १३ हॉटेल, १६ दवाखाने, १३ शाळा, ११ रहिवासी क्षेत्र, १५ कार्यालय, १२ बाजारपेठ यांचा सहभाग नोंदविला आला होता. त्यासाठी समिती गठन करण्यात आली आहे़ स्वच्छता निरीक्षकांकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. समितीने निवड केलेल्या आणि शासनाच्या निकषाप्रमाणे गुणांक देऊन ठरविण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ठ काम करणाºया स्वच्छ हॉटेल, स्वच्छ दावाखाना, स्वच्छ शाळा, स्वच्छ रहिवासी क्षेत्र, स्वच्छ कार्यालय तसेच स्वच्छ बाजारपेठ यांना महापौर चंद्रकांत सोनार, आयु्क्त अजिज शेख यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे़ यावेळी स्वच्छ सर्वेक्षणाचे माहिती व निकषाबाबत सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांनी माहिती दिली़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सनेर यांनी केले.
कार्यक्रमात शाळांचे प्रतिनीधी सोनल गुप्ते, मुख्याध्यापक आर. व्ही. पाटील यांनी महापालिकेचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी आयुक्त अजिज शेख यांनी उपस्थितांना डेंग्यु या आजाराबाबत मार्गदर्शन करून स्वच्छ सर्वेक्षण २०२० यामध्ये स्वयंस्फूतीर्ने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
महापौर सोनार यांनी मानांकन प्राप्त नागरीकांचे अभिनंदन करून स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी, अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमास उपायुक्त गणेश गिरी, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, हर्षकुमार रेलन, भिकन वराडे, चेतन मंडार, करीम शेख, प्रवीण अग्रवाल, किरण अहिरराव, वसीम बारी, डॉ. सरफराज अन्सारी, संजय अहिरे, नितीन चौधरी, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज वाघ यांनी केले.
प्रशासनाचे प्रयत्न
शहरात स्वच्छताविषयक अनेक उपक्रम महापालिकेकडून राबविण्यात येत आहे़ त्या आनुषंगाने सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येत आहे़

Web Title:  The rating was received by two organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे