अपघातानंतर ग्रामस्थांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:36 IST2019-12-01T12:35:24+5:302019-12-01T12:36:00+5:30

विंचूर पुलाच्या दुरवस्थेकडे ‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

Rastroko of villagers after the accident | अपघातानंतर ग्रामस्थांचा रास्तारोको

अपघातानंतर ग्रामस्थांचा रास्तारोको

विंचूर : बोरी नदीवरील पुलाची पार दुरवस्था झाली आहे़ १३५ वर्ष जुना असलेल्या या पुलाच्या नुतनीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे़ शनिवारी पहाटे घडलेल्या या अपघातामुळे हे पुन्हा अधोरेखित झाले असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विंचूर ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन छेडले़ यावेळी दोन्ही बाजुला काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ 
 आजुबाजुला  असलेले कठडे  कमी उंचीचे असून त्यालाही तडे पडलेले आहेत. झुडुपे उगवली आहेत. वाहनासह कठडे नदीत खडकाळ जागेवर कोसळतील, अशी स्थिती आहे. अपघात व जिवीत वा वित्तीय हानी टाळण्यासाठी तत्काल नवीन पूलाचे बांधकाम करावे व सध्या पूलावरील जीवघेणे  खड्डे संबंधित विभागाने बुजवावेत, अशी मागणी ‘लोकमत’ने सप्टेंबर महिन्यातच वृत्त प्रकाशित करुन लावून धरली होती़ याकडे दुर्लक्ष केले असल्याचे अधोरेखित होत आहे़ या पुलाच्या दुरुस्तीसह अनुषंगिक बाबीकडे आतातरी गांभिर्याने पाहण्याची गरज आहे़

Web Title: Rastroko of villagers after the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे