समता परिषदेतर्फे रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 22:03 IST2020-12-03T22:02:53+5:302020-12-03T22:03:18+5:30
समीर भुजबळ यांच्या अटकेचा निषेध, आंदोलनकांना अटक अन् सुटका

dhule
धुळे : खासदार समीर भुजबळ यांच्यासह मोर्चेकऱ्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी रास्तारोको आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.
पुण्यात गुरूवारी शनिवार वाड्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ओबीसी नेते माजी खासदार समीर भुजबळ, बापुसाहेब भुजबळ, नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, दिलीप खैरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना अटक केली.
या अटकेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, महानगर प्रमुख गोपाल देवरे, युवक महानगर प्रमुख उमेश महाजन, कार्याध्यक्ष आर. के. माळी, राष्ट्रवादी जिल्हा सचिव राजेंद्र चौधरी, जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष महेंद्र शिरसाठ, दादा वाडीले, साक्री तालुकाध्यक्ष सतीश बाविस्कर, धिरज माळी, गुलाब माळी, विजय अहिरे, विशाल माळी, आनंदा चौधरी आदी समता सैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
रास्तारोको आदांलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नंतर वाहतुक सुरळीत झाली.