रस्त्यासाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:32+5:302021-06-16T04:47:32+5:30

बेहेड ते विटाई या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. या मार्गावरून म्हसदीसह परिसरातील शेतकरी कांद्यासह ...

Rastaroko agitation by Shiv Sena for roads | रस्त्यासाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन

रस्त्यासाठी शिवसेनेतर्फे रास्तारोको आंदोलन

बेहेड ते विटाई या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. या मार्गावरून म्हसदीसह परिसरातील शेतकरी कांद्यासह इतर पीक विक्रीसाठी बागलण येथे जात असतात. मात्र, या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्डयांत रस्ता असा प्रश्न या रस्त्यावरून जाणाऱ्यांना पडत असतो. खराब रस्त्यांमुळे हाडांचे आजार वाढले आहेत. त्याचबरोबर वाहन खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्यावरून डंपरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने रस्ता

खराब झाला आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे आणि शिवसेनेचे विभागप्रमुख मंगेश नेरे, छोटूराम तोरवाने यांनी मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी निवेदन स्वीकारण्यासाठी हजर न राहिल्याने शिवसेना तालुकाप्रमुख पंकज मराठे, पंचायत समिती सदस्य बाळु टाटीया, मंगेश नेरे, बेहेडचे सरपंच वसंत तोरवाने, विटाईचे अशोक सावळे, दादाजी बेडसे, छोटु तोरावणे, रमेश बच्छाव, योगेश बच्छाव, योगेश तोरावणे, सतीश तोरवाने, प्रवीण तोरावणे, राजेंद्र तोरावणे, नाना बेडसे, मच्छिंद्र माळी यांनी संताप व्यक्त केला. पाच दिवसांच्या आत ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांची सार्वजनिक बांधकाम विभागासोबत बैठक घेण्याची मागणी केली. अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने जोरदार प्रत्युत्तर देईल असा इशारा देण्यात आला. रास्तारोकोमुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.

Web Title: Rastaroko agitation by Shiv Sena for roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.