अनिकेत वाकळे यांना रासेयोचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:36 IST2021-08-15T04:36:59+5:302021-08-15T04:36:59+5:30

केंद्र शासनाच्या पद्धतीवर आधारित राज्यस्तरावर राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ वर्षापासून सुरू करण्यात ...

Raseyo's state level award announced to Aniket Wakle | अनिकेत वाकळे यांना रासेयोचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

अनिकेत वाकळे यांना रासेयोचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

केंद्र शासनाच्या पद्धतीवर आधारित राज्यस्तरावर राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ वर्षापासून सुरू करण्यात आली.

त्यानुसार, महाराष्ट्रातील विद्यापीठांकडून प्रस्ताव मागवण्यात आले व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सन २०२०-२१ मधे नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली. पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चव्हाण, सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय पुणे डॉ. सुनील मासाळकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. दीपक सावळे, डॉ. नजीर तांबोळी, नेहरू युवा केंद्र जिल्हा युवा समन्वयक अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांनी अनिकेत रवींद्र वाकळे यांचे काैतुक केले आहे.

अनिकेत वाकळे हे बहुजन रयत परिषदेचे प्रदेश महासचिव तथा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वाकळे, धुळे यांचे सुपुत्र आहेत.

Web Title: Raseyo's state level award announced to Aniket Wakle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.