शिंदखेडा तालुक्यात आढळला दुर्मीळ नाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 22:11 IST2020-06-04T22:10:52+5:302020-06-04T22:11:11+5:30
सर्पमित्रांनी पकडले : जंगलात सोडणार

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ येथे गुरुवारी धनंजय ईशी यांच्या शेतात अलनीनो प्रकारातील दुर्मीळ नाग आढळला़
धुळ्यातील आदर्श सर्पमित्र ग्रुपचे सचिन व सौरव बागल यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली़ त्यानंतर त्यांनी त्वरीत निमगुळ गाव गाठून सर्प सुरक्षित पकडून धुळ्यात आणला़ वन विभागाच्या परवानगीने त्याला जंगलात सोडले जाणार आहे़
हा सर्प नाग प्रजातीचा असून पाच फुट लांबीचा आहे़ त्याच्या शरिरात रंगद्रव्याचा अभाव आहे़ त्यामुळे या नागाची त्वचा पांढरी आहे़ त्याचे डोळे लाल व गुलाबी आहेत़ सर्पांमधील हा अनुवांशिक, जन्मजात बदलाची ही नैसर्गिक क्रिया आहे़ त्याला अल्नीनिजम म्हणतात़ त्यामुळे हा सर्प अलनीनो प्रकारात मोडतो़ हा नाग अतीशय दुर्मीळ आहे़