जवखेडा येथे बालिकेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 17:59 IST2017-07-06T17:59:18+5:302017-07-06T17:59:18+5:30

जवखेडा येथील एका 65 वर्षीय वृद्धाने घराजवळील 5 वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलिसात नोंदविण्यात आली आह़े

Rape of the girl at Jawkheda | जवखेडा येथे बालिकेवर बलात्कार

जवखेडा येथे बालिकेवर बलात्कार

 ऑनलाईन लोकमत

शिरपूर,दि.6 - तालुक्यातील जवखेडा येथील एका 65 वर्षीय वृद्धाने घराजवळील 5 वर्षीय बालिकेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार शहर पोलिसात  नोंदविण्यात आली आह़े
सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली़ जवखेडा येथील विवाहितेची 5 वर्षीय बालिका घराबाहेर खेळत होती़ त्या वेळी शेजारी राहणारा शिवाजी ङिांगा पाटील याने तिला चॉकलेट देण्याचा बहाणा करून घरात बोलावून घेतल़े तिला चॉकलेट देत मोबाइल दाखविण्याच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन केले. ती बालिका रडू लागल्यामुळे त्या नराधमाने घाबरून तिला सोडून दिल़े हा प्रकार पीडित बालिकेच्या आईच्या लक्षात येताच तिला रुग्णालयात दाखल केल़े तसेच तिच्या तक्रारीवरून शिवाजी पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आह़े आरोपीला अटक केल्यानंतर 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आह़े
 

Web Title: Rape of the girl at Jawkheda