रामी - पथारे ग्रामस्थांतर्फे शहादा रोड पीरबर्डी चौफुलीवर तातडीने गतिरोधक टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:31 IST2021-01-17T04:31:07+5:302021-01-17T04:31:07+5:30

दोंडाईचा - शहादा या मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ भयंकर वाढली आहे. दोंडाईचाहून शहादाकडे जाताना रेल्वे उड्डाणपूल ओलांडल्यानंतर ...

Rami - Pathare villagers demand immediate installation of speed bumps on Shahada Road Pirbardi Chowfuli | रामी - पथारे ग्रामस्थांतर्फे शहादा रोड पीरबर्डी चौफुलीवर तातडीने गतिरोधक टाकण्याची मागणी

रामी - पथारे ग्रामस्थांतर्फे शहादा रोड पीरबर्डी चौफुलीवर तातडीने गतिरोधक टाकण्याची मागणी

दोंडाईचा - शहादा या मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ भयंकर वाढली आहे. दोंडाईचाहून शहादाकडे जाताना रेल्वे उड्डाणपूल ओलांडल्यानंतर साधारणत: दोन कि. मी. अंतरावर पीरबर्डी असून त्याठिकाणी चौफुली आहे. दक्षिणेकडून दोंडाईचा, पश्चिमेकडे रामी - पथारे व पूर्वेकडे हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज ही शाळा व दाऊळ या गावी जाणारा रस्ता आहे. तसेच उत्तरेकडे शहादा आहे. याप्रमाणे या रस्त्यांवर सदैव वाहने ये - जा करीत असतात. यात रामी - पथारे गावातील नागरिकांची दोंडाईचा येथे दररोज ये - जा असते. या ग्रामस्थांना दोंडाईचा येथे येण्यासाठी पीरबर्डी चौफुली ओलांडून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. ही चौफुली येताच येथील भरधाव जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनांना पाहून अपघाताच्या भीतीमुळे पोटात गोळा येतो. गेल्यावर्षी या ठिकाणी जवळपास सात-आठ वेळा अपघातही झाले आहेत. याकरिता दोंडाईचा व शहादाहून ये - जा करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण करणे गरजेचे असल्याने सदर ठिकाणी दोन्ही बाजूस रोडवर प्रत्येकी दोन गतिरोधक त्वरित उभारावेत, जेणेकरून अचानक घडणाऱ्या दुर्घटना व अपघात टळतील. तसेच वाहनचालकही आपल्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवतील आणि पुढे जातील.

विशेषत: याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग - दोंडाईचा, शिंदखेडा आणि धुळे विभाग कार्यालयाशी रामी-पथारे ग्रामपंचायतच्या वतीने पत्राद्वारे विनंतीदेखील करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी या बाबीकडे तातडीने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून त्वरित या ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी रामी-पथारे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Rami - Pathare villagers demand immediate installation of speed bumps on Shahada Road Pirbardi Chowfuli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.