राम मंदिर निधी समर्पण अभियान, नगावला सोमवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 22:35 IST2021-01-10T22:34:53+5:302021-01-10T22:35:13+5:30
राम भदाणे यांच्याकडून उपस्थितीचे आवाहन

राम मंदिर निधी समर्पण अभियान, नगावला सोमवारी बैठक
धुळे : प्रभू श्रीराम मंदिर निधी समर्पन अभियान नियोजनासंदर्भात धुळे तालुक्यातील नगाव येथे सोमवार ११ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़ सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य राम भदाणे यांनी केले आहे़
ादर मंदीर संपुर्ण जग भरातील व देशातील राम भक्तांच्या लोक वर्गणीतुन उभे राहणार आहे. निधी संकलनाचे अभियान हे संपुर्ण देशभर दि. १५ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ या एका महिन्यासाठी राहणार आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील निधी संकलन अभियानाच्या नियोजनासाठी सोमवार दि ११ जानेवारी २०२१ रोजी दु.३:०० वा. नगांव (गंगामाई इंजिनिअरींग कॉलेज)येथे व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीस श्रीरामभक्त मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नगांव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राम भदाणे यांनी केले आहे.