धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे ‘सीएए’च्या समर्थनार्थ काढली रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 11:59 IST2020-02-06T11:59:24+5:302020-02-06T11:59:42+5:30
राष्टÑीय सुरक्षा मंचतर्फे रॅलीचे आयोजन, हजारो नागरिकांचा सहभाग

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे ‘सीएए’च्या समर्थनार्थ काढली रॅली
आॅनलाइन लोकमत
पिंपळनेर : केंद्र शासनाने केलेल्या ‘सीसीए’ कायद्याच्या (नागरिकता संशोधन कायदा) समर्थनार्थ पिंपळनेरला राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे बुधवारी सकाळी भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारो स्त्री-पुरूष सहभागी झाले होते.
बुधवारी सकाळी १० वाजता गांधी चौकातून रॅलीला सुरूवात झाली. रॅलीच्या अग्रभागी असलेल्या एका वाहनावर राष्टÑपुरूषाच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. तसेच रॅली मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली होती.
ही रॅली वीर सावरकर चौक, माळी गल्ली, विश्वनाथ चौक, बस स्टॅन्ड, सटाणा रोड, एखंडे गल्ली, मुरलीधर मंदिर, नाना चौक, शिवाजी चौक, श्री दत्त चौकमार्गे गांधी चौकात आली. तेथे रॅलीची सांगता झाली. येथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले.
सभेचे प्रमुख वक्ते प्रांत सहमंत्री देवगिरी प्रांत अधिवक्ता परिषदेचे अॅड. आशिष जाधव व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महामंत्री महाराष्ट्र प्रांत स्वप्निल बेगडे हे होते.
रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. रॅलीच्या दरम्यान नागरिकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. राष्टÑगीताने रॅलीची सांगता झाली. त्यानंतर सर्वांना खिचडीचे वाटप केले. अतिशय शांततेत ही रॅली पार पडली.