शिरपुरात रक्षाबंधन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:38 IST2021-08-23T04:38:45+5:302021-08-23T04:38:45+5:30
पिळोदा येथे वृक्षांना राखी पिळोदा येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनानिमित्त वृक्षांना राखी बांधण्याचा उपक्रम अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात ...

शिरपुरात रक्षाबंधन साजरा
पिळोदा येथे वृक्षांना राखी
पिळोदा येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनानिमित्त वृक्षांना राखी बांधण्याचा उपक्रम अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक ए.एच. जाधव यांनी पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे शुध्द पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्षांचे महत्त्व स्पष्ट केले.
राख्या बनविण्यासाठी स्वाती मोरे, वैष्णवी इच्छे, प्रगती भोई, करुणा पाटील या विद्यार्थिनींनी मनापासून कष्ट घेऊन वृक्षांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला़ याप्रसंगी के.ए. गोपाळ, एम.वाय. पाटील, आर.एस. शिरसाठ, आर.पी. देवरे, पी.ए. कोळी, एस.बी. पाटील, सचिन बोरसे, आर.डी. राजपूत, राजू भिल, चेतन पाटील, मनीष खैरनार उपस्थित होते.
एसआरबीला रक्षाबंधन साजरा
दहिवद येथील एस़ आर. बाविस्कर इंटरनॅशनल स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात इ. ६ वी ते १० वी या वर्गातील विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. शाळेत शुभेच्छा पत्र (ग्रीटिंग कार्ड), राखी पोस्टर बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये सोनाली मुकेश भिल हिने प्रथम क्रमांक मिळविला़ ओम प्रशांत साळुंखे याने ग्रीटिंग कार्ड मेकिंग स्पर्ध्येत प्रथम क्रमांक मिळविला. तसेच इ. ८ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून पोस्टर बनवले आणि शाळेच्या आर्ट गॅलरीचे सुशोभिकरण केले. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी राखी बांधून आणि चॉकलेट वाटून कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर उपस्थित होते़ यावेळी प्राचार्य प्रकाश व्यास यांनी वेगवेगळ्या भारतीय उत्सवांचे महत्त्व समजावून सांगितले़ तसेच रक्षाबंधन पर्वाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन शीतल ठाकरे तर आभार प्रदर्शन हेमलता पाटील यांनी केले.
राखी बनवणे स्पर्धा
शिरपूर येथील एच.आर. पटेल प्राथमिक कन्या शाळेत राखी बनवणे स्पर्धा झाली.
बालवाडी वर्गात प्रथम क्रमांक विभा गिरीश सनेर, अनन्या चंद्रशेखर पाटील, डिंपल विश्वास ढिवरे, जुई मंगेश सूर्यवंशी, द्वितीय रुचिका अमित माळी, दुर्वा राहुल पाटील, इशिता मनोज पाटील, हर्षिता मनोहर माळी तर तृतीय क्रमांक ज्ञानेश्वरी अभिषेक चौधरी, हिताक्षी कृष्णा पाटील, माहेश्वरी शशिकांत राजपूत, श्रध्दा आईबेन हजारे हिने पटकाविला़
दुसरी वर्गात हषार्ली अनिल कोळी, उन्नती वसंत पाटील, आराध्या प्रवीण येशी, आराध्या अरविंद पाटील, भाविका विजय पाटील, देवयानी विनोद पाटील, तिसरी वर्गात खुशीता योगेश पाटील, ऋतुजा संदीप तुपे, आनंदी दिनेश शर्मा, सायली मयूर सोनगिरे, मानसी नीलेश पाटील, भूमिका रवींद्र मराठे, चौथी वर्गात प्रणाली योगेश शिंदे, वेदिका कृष्णा कदम, गायत्री कैलास सोनवणे, राशी योगेश पाटील, प्रणाली गणेश धनगर, गार्गी नितीन पाटील यांनी यश मिळविले़
मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी विजेत्यांचे कौतुक केले़ स्पर्धेकरिता भारती मराठे, छाया वाडीले, योजना पाटील, श्रीराम पाटील, रूपेश कुलकर्णी, अविनाश राजपूत, उज्ज्वला पाटील, आधार अहिरे आदी उपस्थित होते.