काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:52 PM2018-05-14T22:52:10+5:302018-05-14T22:52:10+5:30

नांदवण शिवार : गुन्हा दाखलसाठी गर्दी

Rake in the black market | काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पकडला

काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पकडला

Next
ठळक मुद्देसाक्री तालुक्यातील नांदवण शिवारातील घटनारेशनचा माल काळ्या बाजारात जाताना पकडलापोलिसात नोंदीसाठी ग्रामस्थांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
साक्री : काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ साक्री तालुक्यातील नांदवण शिवारात ग्रामस्थांनी पकडला़ ही कारवाई सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी साक्री पोलिसात गुन्हा नोंदविण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती़ 
साक्री तालुक्यातील नांदवण गावात गरीबांसाठी असलेले तांदूळ, गहू, साखर आणि अन्य साहित्य प्रशासनाकडून अद्यापपावेतो मिळालेला नाही़ गावकºयांचे रेशन कार्ड हे रेशनदुकानदाराकडे जमा करुन ठेवलेले आहेत़ असा आरोप साक्री पोलीस स्टेशनमध्ये नांदवण गावातील महिलांनी केला़ रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी गावातील शेकडो महिला-पुरुषांनी सोमवारी रात्री साक्री पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडले होते़ यावेळेस तहसील कार्यालयातील अधिकारी आल्याशिवाय आम्ही कारवाई करु शकत नाही, असे पोलिसांनी ग्रामस्थांना सांगितले़ ग्रामस्थांना सकाळी येण्याचा सल्ला पोलिसांनी दिल्यामुळे ग्रामस्थ निघून गेले आहेत़ 

Web Title: Rake in the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.