स्वीकृत नगरसेवकपदी राजपूत, धनगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:40 IST2021-08-24T04:40:12+5:302021-08-24T04:40:12+5:30
नगरपालिका सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवर रावल होत्या. पाचव्या वर्षासाठी भाजपचे ...

स्वीकृत नगरसेवकपदी राजपूत, धनगर
नगरपालिका सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवर रावल होत्या. पाचव्या वर्षासाठी भाजपचे नरेंद्र वामनसिंग राजपूत व धनगर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बारकू धनगर यांंची स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, उपमुख्याधिकारी हर्षल भामरे यांनी सहकार्य केले. यावेळी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, ज्येष्ठ नगरसेवक करणसिंग देशमुख, बांधकाम सभापती निखिल राजपूत, नगरसेवक नरेंद्र कोळी, नरेंद्र गिरासे, सुफियान तडवी, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, आरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे, भरतरी ठाकूर, जितेंद्र गिरासे, खलील बागवान, राजेश जाधव, संजय तावडे, अनिल सिसोदिया, आदी मान्यवर उपस्थित होते.