वादळी वायासह पाऊस, लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 11:33 IST2019-06-12T11:32:33+5:302019-06-12T11:33:52+5:30
शहरासह जिल्ह्यात सर्वदूर हजेरी : वृक्ष उन्मळली, पत्रे उडाली, वीज पुरवठा खंडीतमुळे उडाली त्रेधा

अवधान गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे उडालेले पत्रे आणि त्यामुळे शाळेचे झालेले नुकसान
धुळे : मान्सुनपुर्व पावसाने धुळे शहरासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार हजेरी लावली़ शहरासह मुंबई आग्रा महामार्ग आणि नागपूर सुरत महामार्गावरील ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडली़ अवधान एमआयडीसीत लोखंडाचे शेड, पत्र उडाली़ कुंपनाच्या भिंतीही कोसळल्या़ बºयाच ठिकाणी विजेचा पुरवठा खंडीत झाला़ वादळीवारा जोरात असल्याने शहरातील वर्दळ अक्षरश: १५ ते २० मिनीटे खोळंबली होती़ वादळानंतर पावसाच्या सरी कोसळल्याने सायंकाळी गारवा निर्माण झाला होता़ यात मात्र प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़
पावसाची होती प्रतीक्षा
यंदा तापमानात झालेल्या वाढीमुळे नागरिकांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागला़ फेब्रुवारी महिन्यापासूनच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरूवात केली होती़ तर मे मध्ये काही दिवस वगळता महिनाभर तापमान चाळीशीच्या पारच होते़ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पावसाचे आगमन होत नसल्याने उकाड्यात वाढ झाली होती़ मात्र मंगळवारी दुपारी १५ ते २० मिनीटे मान्सूनपूर्व पावसाने शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली़ साडेचार वाजेच्या सुमारास हलक्या स्वरुपात वादळ सुरु झाले़ जोरदार वादळ आणि त्या पाठोपाठ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या़ परिणामी शहरातील बहुतांश ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली होती़ रस्त्यावरील वर्दळ काही काळ थांबली होती़
वाहतूक विस्कळीत
मुंबई-आग्रा महामार्गावरील शहरानजिक असलेल्या सुरत बायपास जवळच नव्याने उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरु आहे़ वादळ जोरात असल्यामुळे या ठिकाणी उभारण्यात येत असलेले उड्डाणपुलाचे लोखंडाच्या सळ्या वाकल्या़ त्या महामार्गावर झुकल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवावी लागली होती़ त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़
विजेचा पुरवठा खंडीत
दुपारी अवघ्या १५ ते २० मिनीटाच्या पावसाने सर्वांचीच त्रेधा उडविली असताना विजेचा पुरवठा देखील लागलीच खंडीत झाल्याने बत्ती गूल झाली होती़ गोंदूर सबस्टेशन बंद पडल्याने देवपुर परिसर, तिसगाव, नगावसह सर्वच ठिकाणी विजेचा पुरवठा खंडीत झाला़ शहरात आणि ग्रामीण भागात विजेचा पुरवठा खंडीत झाला होता़ विजेचे खांब कोसळले, तारा तुटल्याने विज वितरण कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे़
आठवडे बाजारावर परिणाम
धुळ्याचा मंगळवारी आठवडे बाजार भरतो़ त्यामुळे शेतीमाल हा लहान मोठ्या वाहनाने कृषी उत्पन्न बाजार समितीत आणला जातो़ दुपारी अचानक वादळ सुरु झाल्याने सर्वांचीच धांदल उडाली़ बाजार समितीच्या आवारात बºयाच ठिकाणचे पत्रे उडाली़ काही पत्रे उडून ती वाहनावर आदळल्याने वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते़ तर दुसरीकडे शेतीमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतीमाल हा सुरक्षित ठिकाणी नेण्यात शेतकरी व्यस्त होते़
वृक्ष उन्मळली
शहरातील बहुतांश ठिकाणी लहान मोठी वृक्ष वादळी वाºयामुळे उन्मळून पडली होती़ विजेच्या ताराही तुटल्या होत्या़ शहरात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ मदतीसाठी धावपळ सुरु होती़
एमआयडीसीत प्रचंड नुकसान
*वादळी वाºयासह दुपारी अचानक रौद्ररुप धारण केल्यामुळे त्याचा फटका शहरानजिक असलेल्या एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात बसला आहे़ या भागातील हॉटेल टॉपलाईन रिसोर्ट, महेश आॅटोचे ६ लाख, डिसान अॅग्रो १५ ते २० लाखांचे नुकसानीचा अंदाज आहे़
*आकाश आॅटोमोटीव्हज, अक्षय होंडा, चौधरी टोयाटो यांच्या शो-रुमच्या काचा फुटल्या आहेत़ नुकसान झाले असलेतरी जीवितहानी झालेली नाही़
*अवधान एमआयडीसीमधील बºयाच कंपन्यांचे लोखंडाचे मोठ मोठे अँगल वाकून गेले आहेत़ गोदामात लावण्यात आलेले पत्रेही उडाली़ या आवारात असलेली जुनी आणि मोठी अशी वृक्ष उन्मळून पडल्याने सर्वांचीच त्रेधा उडाली़
*अवधान फाट्यावरील लहान-मोठ्या स्टॉल वादळात उडाले़
*महामार्गावरील तालुक्यातील अवधान येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे पत्र उडाली़ त्यामुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़