Rain onion with corn | मक्यासह कांद्याला पावसाचा फटका
dhule

धुळे : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने कापुस, मका, कांदा, सोयाबिनसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, धुळे कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला मका व काद्या पावसात सापडल्याने मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे़
शेतात उभे असलेले कापूस, पपई, मका या पिकाचे या पावसामुळे नुकसान झाले. तर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरी व इतर पिके काढून घेतल्याने त्यांचे नुकसान टळले. परंतु शेतात झाकून ठेवलेला शेतीमालाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर वेचणीवर आलेल्या कापसाला सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान शेतकºयांनी व्यापाºयांना विकलेला माल पावसाने ओला झाल्याने कृऊबा समिती सुकविण्यात येत आहे़
प्रकल्प ओव्हरफ्लो
जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहे. नदी, नाल्यांचा प्रवास सुरूच असल्याने या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहेत़ तर शहराला पाणीपुरवठा करणाºया अक्कलपाडा, नकाणे, डेडरगावसह अन्य प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत़
कांद्याची आवक
कांद्याची आवक मंदावल्यामुळे गेल्या महिन्यापासून कांद्याचे दर वाढू लागले आहेत. तर यंदाचा पावसाचा परिणाम इतर पिकांसह कांद्यावर देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे़ त्यामुळे इतर बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक कमी आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठेत कांद्याची आवक वाढलेली आहे. दरम्यान खरेदी केलेल्या कांद्यास पावसाच्या पाण्यामुळे कोंब फुटले असून हा कांदा वाया जाणार असल्याने व्यापारी अडचणीत आले आहेत.

Web Title: Rain onion with corn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.