शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

पावसाने जीर्ण इमारतील कोसळली ; प्राणहानी टळली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:22 IST

महापालिका :  शहरातील र्जीण इमारतीचा प्रश्न ऐरणीवर

धुळे : शहरातील धोकादायक इमारती  दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडून या इमारतींबाबत कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याने रविवारी झालेल्या पावसाने दोन इमारती कोसळल्या, सुदैवाने यात कोणतीही प्राणहाणी झाली नाही़ शहरात तब्बल १०५ धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. जुने धुळे, पेठ भाग व अन्य काही परिसरांमध्ये इंग्रजकालिन इमारती आहेत़ त्यापैकी बहुतांश इमारतींची बांधकामे १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहेत़ त्यापैकी बहुतांश धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचा रहिवास आहे.  पावसाळ्यात वादळी वारे व मुसळधार पाऊस झाल्यास धोकादायक इमारती कोसळल्यास वित्त व जीवितहानीदेखील होऊ शकते़ नोटीस बजावण्याचे कार्य  दरवर्षी अधिनियम १९४९ मधील इमारतीसंबंधी अधिनियम २६४ (१) नुसार जीर्ण धोकादायक इमारतींना महापालिका प्रशासनाकडून नोटिसा बजाविणे क्रमप्राप्त आहे. या नोटिसा मिळाल्यानंतर इमारतीच्या मालकाने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करून मनपाकडे सादर करून त्यावर पुढील कार्यवाही केली जाऊ शकते. मात्र केवळ दरवर्षी  नोटीस बजावण्याच्या मनपा कोणतीही भुमिका घेत नसल्याने जीर्ण इमारतीचा प्रश्न एैरणीवर आला आहे़ अशा घडल्या घटनाबºयाच दिवसांच्या विश्रातीनंतर रविवारी सायकांळी मुसळधार पाऊस झाला़ त्यामुळे अनेक वसाहतीमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे़ याच रात्री जुन्या धुळ्यातील ग़नं़ ७ मधील भोईवाडा परिसरात राहणारे जयवंत मानिक खैरनार हे एका कापड दुकानावर कामाला आहे़ रविवारी झालेल्या पाऊसाने घराची भिंत खचत असल्याचा भास झाल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घरातील सदस्यांना बाहेर काढले़ ही घटना दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़दुसºया घटनेत देवपूर येथील गोराबा काका कुंभार खुंट परिसरातील डॉ़पावसकर व जैन यांच्या मालकीची र्जीण रिकामी इमारत आहे़ रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास इमारतीचा भिंत कोसळली़ सुदैवाने दोन्ही घटनेत प्राणहाणी जरी झाली नसली तरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे 

टॅग्स :Dhuleधुळे