धुळे : येथील रेल्वे स्थानकावर विद्युत संकेत अनुरक्षक म्हणून नोकरी करणाºया गौरवकुमार पी. महेंद्रकुमार यांच्या रेल्वे क्वॉर्टरमधून सोन्याचे दागिने चोरीला गेलेले आहेत़ ही घटना २४ जुलै रोजी सकाळी ६ ते २५ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे़ चोरट्याने ३० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि १२ हजार रुपये किंमतीची ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरुन नेली आहे़ आठ दिवसानंतर हा प्रकार लक्षात आल्याने शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे़ तक्रार दाखल झाल्याने चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़
रेल्वे कर्मचा-याचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:16 IST