आरक्षणाच्या मागणीसाठी धुळ्यात रेल रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:44 IST2018-07-28T13:43:06+5:302018-07-28T13:44:11+5:30
मराठा समाज : पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती

आरक्षणाच्या मागणीसाठी धुळ्यात रेल रोको आंदोलन
ठळक मुद्देधुळ्यात मराठा समाजातर्फे रेलरोको आंदोलनआरक्षणाची मागणी कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आरक्षणाच्या मागणीसाठी धुळ्यात रेल्वे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन शनिवारी दुपारी करण्यात आले़ त्यानंतर घोषणाबाजी करत आंदोलनाचा समारोप झाला़ कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक एस़ जे़ महाजन यांनी दिली़ यावेळी मनोज मोरे, संजय वाल्हे, निंबा मराठे यांच्यासह अन्य उपस्थित होते़