शिरपूरच्या आर. सी. पटेल फार्मसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:49+5:302021-09-15T04:41:49+5:30
शिरपूर : शहरातील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे एन.आय.आर.एफ. मानांकन प्राप्त झाले असून उत्तर महाराष्ट्र ...

शिरपूरच्या आर. सी. पटेल फार्मसी
शिरपूर : शहरातील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे एन.आय.आर.एफ. मानांकन प्राप्त झाले असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून राष्ट्रीय स्तरावर झळकलेले हे एकमेव महाविद्यालय असल्याची माहिती येथील आर. सी. पटेल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी दिली.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकींग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) अंतर्गत संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांचे व शैक्षणिक संस्थांचे रँकींग ठरविण्यासाठी २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षासाठी नुकतेच प्रस्ताव मागविण्यात आले होते. विविध पारंपरिक विद्यापीठे तसेच इंजिनिअरींग, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ आणि आर्किटेक्चर महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विविध निकषांआधारे ही क्रमवारी ठरविण्यात आली आहे. त्यामध्ये संपूर्ण भारतातील फार्मसी महाविद्यालयातून १०० सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत शिरपूर येथील आर.सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाने ५० वे स्थान प्राप्त केले असून टॉप ५० मध्ये स्थान पटकवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत ही मानांकन यादी नुकतीच संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत आर.सी.पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च शिरपूर हे एकमेव महाविद्यालय आहे.
संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सेवानिवृत्त कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. एस. जे. सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, डिप्लोमा प्राचार्य डॉ. नितीन हसवानी यांनी यशासाठी अभिनंदन केले.
एन.आय.आर.एफ.साठी प्रस्ताव सादरीकरणाचे कार्य फार्मासुटीक्स विभागप्रमुख डॉ. एच. एस. महाजन यांनी नोडल अधिकारी म्हणून काम बघितले. उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव सादर करण्यात आला. विविध विभाग प्रमुख डॉ. एस. डी. पाटील, डॉ.एस. एस.चालिकवार, डॉ. शितल झांबड, डॉ.एम़ जी. कळसकर, डॉ. प्रीतम जैन, डॉ. पंकज नेरकर, डॉ. आशिष गोरले, डिप्लोमा प्राचार्य डॉ. नितीन हसवानी, रजिस्ट्रार जितेश जाधव यांचे सहकार्य लाभले. हे यश प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या एकत्रित मेहनतीने शक्य झाल्याचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी स्पष्ट केले.
समाजाभिमुख संशोधन उच्च मूल्याधिष्ठीत उत्तम शिक्षण, तांत्रिक-कौशल्यासह व्यक्तिमत्त्व विकास हीच भारतीय शिक्षणाची गरज बनली आहे. जी शैक्षणिक संस्था या गरजा पूर्ण करेल ती आपोआपच अग्रमानांकित बनेल. या राष्ट्रीय क्रमवारीतील स्थानामुळे आनंद झाल्याचे सांगत भविष्यात फार्मसी क्षेत्रात समाजापयोगी संशोधन करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळत राहील़
- प्राचार्य डॉ. संजय सुराणा
महाविद्यालयाने घेतलेल्या अथक परिश्रमाचे फलश्रुती म्हणजेच एन.आय.आर.एफ मानांकन आणि त्यामुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला बहुमान होय.
-आमदार अमरिशभाई पटेल,
संस्थाध्यक्ष, शिरपूर
फोटो- मेलवर/फाईल पहाणे