शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
2
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
3
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
4
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
5
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
6
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
7
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
8
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
9
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
10
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
11
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
12
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
13
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
14
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
15
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
16
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
17
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
18
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
19
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
20
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा

धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अडचणी तत्काळ मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:35 IST

सीईओंच्या दालनात झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर झाली सकारात्मक चर्चा

आॅनलाइन लोकमतधुळे : अनुकंपा तत्वावरील भरती दरवर्षी करण्यात यावी, पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ.सिस्टीम बसवावे यासह जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून, त्या तत्काळ मार्गी लावाव्यात अशी मागणी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने केली. दरम्यान समस्या लवकर मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन सीईओंनी दिले.जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत संघटनेची बैठक सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्या दालनात झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी, सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.यावेळी कर्मचाºयांनी सीईओंसमोर काही मागण्या मांडल्या. त्यात कर्मचाºयांच्या पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषद इमारतीत मध्यवर्ती ठिकाणी आर.ओ.सिस्टीम बसवावी, सातव्या वेतन आयोगानुसार १०,२०,३० वर्षाप्रमाणे आश्वासीत प्रगती योजनाचा लाभ लागू करावा, याबाबतच्या परिपूर्ण नस्त्या तयार करून ठेवाव्यात, वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाºयांच्या पदोन्नतीचे पदे भरतांना १ जानेवारी ते ३१ डिसेंबर संभाव्य रिक्त पदांवर पदोन्नती करण्यात यावी, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन दुरूस्ती करावी, २००८साली झालेल्या दंगलग्रस्तांना मदत करण्यासाठी कर्मचाºयांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले होते. हा १० लाखाचा निधी कल्याण भवनाच्या दुरूस्तीसाठी वर्ग करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. जिल्हा कर्मचारी निवासस्थान दुरूस्ती करण्याबाबतची अनुदानाची नस्ती मंजूर झाली असून लवकरच काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.कर्मचाºयांच्या विविध अडचणींबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेश महाले, सचिव दीपक महाले, कार्याध्यक्ष किशोर पगारे, अनिल बेडसे, पोपटराव सूर्यवंशी, रंजना साळुंखे, रवींद्र देवरे, संतोष बागले, वनराज पाटील, ज्योती पाटील, प्रमिला मदने, दुर्गेश बोरसे, नंदकुमार चौधरी उपस्थित होेते.

टॅग्स :Dhuleधुळे