विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:25 IST2019-07-26T12:24:32+5:302019-07-26T12:25:33+5:30
अॅड. अमित दुसाने : बाल कल्याण समितीतर्फे गुंजन पाटील या विद्यार्थिनीस श्रद्धांजली अर्पण

बालकल्याण समितीच्यावतीने गुंजन पाटील हिला श्रद्धांजली अर्पण करतांना अॅड. अमित दुसाने, प्रा. वैशाली पाटील, प्रा. सुदाम राठोड, मनीषा नानकर आदी
धुळे : शाळा, महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सुरक्षिततेचा विषय अतिशय गंभीर असल्याचे प्रतिपादन बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अॅड. अमित दुसाने यांनी आज व्यक्त केले.
गुरूवारी सकाळी कमलाबाई कन्या शाळेतील विद्यार्थिनी गुंजन पाटील हिला ट्रकने चिरडल्याने, तिचा जागीच मृत्यू झाला. तिला बाल कल्याण समितीच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी अॅड. दुसाने बोलत होते.
अॅड. दुसाने म्हणाले, गुंजनचा जाण्याने तिच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे ती कधीही भरून निघणार नाही. धुळे शहरात वाहतूक नियंत्रक शाखा अस्तित्वात आहे का? असा प्रश्न धुळेकर म्हणून पडला आहे. गुंजनमुळे धुळयातल्या शाळा, महाविद्यालयात जाणाºया विद्यार्थ्यांची काळजी व संरक्षणाचा विषय अंत्यत गंभीर झाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या श्रद्धांजली कार्यक्रमाला यावेळी बालकल्याण समिती सदस्य प्रा. वैशाली पाटील, प्रा. डॉ. सुदाम राठोड, निता खलाणे समुपदेशक, मेडिकल कॉलेज मनिषा नानकर, धीरज दोडे यांच्यासह बालगृहातील मुले, मुली हजर होती.