प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ डी-फार्मसीचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:45+5:302021-09-02T05:17:45+5:30

धुळे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईद्वारे घेण्यात आलेल्या प्रथम व अंतिम वर्ष डिप्लोमा फार्मसी उन्हाळी परीक्षा २०२०-२१ चा ...

Pvt. Suyash of Ravindra Nikam College of D-Pharmacy | प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ डी-फार्मसीचे सुयश

प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ डी-फार्मसीचे सुयश

धुळे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईद्वारे घेण्यात आलेल्या प्रथम व अंतिम वर्ष डिप्लोमा फार्मसी उन्हाळी परीक्षा २०२०-२१ चा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. त्यात गोंदूर येथील प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी (डी-फार्मसी) महाविद्यालयाचा १०० टक्के लागला.

परीक्षेत प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी (डी-फार्मसी)च्या प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात प्रथम वर्ष डी-फार्मसीमध्ये मुकेश चौधरी याने ८६.९१ टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक, ८६.५५ टक्के गुण प्राप्त करत जुगल दुग्गड आणि अनुराधा पटेल यांनी द्वितीय क्रमांक पटकवला तसेच चेतन पाटील याने ८४.८२ टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकावला.

अंतिम वर्ष डी-फार्मसीमध्ये धीरज भास्कर भलकार याने ८९.९० टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयात प्रथम ८८.८९ टक्के गुण प्राप्त करत सौरभ हरी पाटील याने द्वितीय क्रमांक पटकावला तसेच सोनाली बिहाडे यांनी ८७.४० टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकावला.

या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, संस्थेच्या सचिव शुभांगी निकम, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सागर बी. जाधव, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुशील डी. पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी प्रा. शुभम ठाकरे, प्रा. तोष पाटील, प्रा. संदीप रवंदळे, प्रा. सलमान अब्दुल मोबीन, प्रा. अश्विनी चौध यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Pvt. Suyash of Ravindra Nikam College of D-Pharmacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.