६११३ क्विंटल भरडधान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:55 IST2020-06-18T12:54:04+5:302020-06-18T12:55:43+5:30

धुळे जिल्हा : नाफेड तर्फे चार केंद्रावर २१ हजार क्विंटलची हरभऱ्याची खरेदी

Purchase of 6113 quintals of coarse grains | ६११३ क्विंटल भरडधान्याची खरेदी

dhule


धुळे : महाराष्टÑ शासनाच्या अन्ननागरी पुरवठा विभागातर्फे यावर्षी ज्वारी, मका या भरडधान्याचे आॅनलाईन खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. धुळे जिल्ह्यात चार खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. जिल्ह्यातील १४८ शेतकऱ्यांकडून आतपार्यंत ६ हजार ११३ क्विंटल ज्वारी व मक्याची खरेदी करण्यात आलेली आहे. तर केंद्र सरकारच्या नाफेड मार्फत जिल्ह्यातील चार केंद्रावर तब्बल २१ हजार क्विंटल हरभरा खरेदी झालेली आहे. हरभरा खरेदीसाठी शासनाने अजून मुदतवाढ दिलेली आहे.
पूर्वी ज्वारी, मका या भरडधान्याची खरेदी हमी भाव न देताच केली जात होती. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. मात्र शासनाने आता भरडधान्य हमीभावाने खरेदी करण्यास सुरूवात केलेली आहे.
राज्य शासनाने निश्चित केल्यानुसार १ ते ३० जून २०२० या कालावधीत रब्बी हंगामातील ज्वारी, मक्याची या भरडधान्याची हमीभावाने खरेदी सुरू झालेली आहे.
मक्याला १७६० रूपये तर ज्वारीला २५५० रूपये प्रतिक्विंटल भाव देण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात चार केंद्र
नाफेडतर्फे धुळे जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, दोंडाईचा व साक्री येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली होती.
३१००शेतकºयांनी केली नोंदणी
भरडधान्य आॅनलाइन खरेदीसाठी जिल्ह्यातील ३१०० शेतकºयांनी नोंदणी केलेली होती. त्यात मका खरेदीसाठी २५०० तर ज्वारी खरेदीसाठी ६०० शेतकºयांचा समावेश होता. त्यापैकी १४८ शेतकºयांकडून प्रत्यक्ष मका व ज्वारीची खरेदी करण्यात आली. त्यात मका ११७ तर ३१ शेतकºयांकडून ज्वारीची खरेदी करण्यात आलेली आहे.
६११३क्विंटल धान्य खरेदी
जिल्ह्यातील केंद्रावर एकूण ६ हजार ११३ भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली आहे. यात मक्याची ५ हजार ५४०.५० क्विंटल तर ज्वारीची ५७३ क्विंटल खरेदी करण्यात आली.
ज्वारीची फक्त धुळ्यातच खरेदी
दरम्यान जिल्ह्यातील चार पैकी फक्त धुळे येथील केंद्रावरच ज्वारीची खरेदी झालेली आहे. उर्वरित शिरपूर, दोंडाईचा, साक्री या केंद्रावर ज्वारीची आवकच झालेली नसल्याचे सांगण्यात आले.
तूर खरेदीला कमी प्रतिसाद
नाफेडतर्फे गेल्या हंगामात तूर खरेदी करण्यात आली होती. जिल्हयातील १९६ शेतकºयांकडून १४२९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आलेली आहे. यावेळी तुर खरेदीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: Purchase of 6113 quintals of coarse grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे