३०० रूपयांची लाच घेतांना दुय्यम निबंधकासह पंटरला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 21:19 IST2021-03-18T21:19:06+5:302021-03-18T21:19:28+5:30
लाचलुचपत विभागाने सापळा रचून केली कारवाई

३०० रूपयांची लाच घेतांना दुय्यम निबंधकासह पंटरला पकडले
शिरपूर : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खताची रजिस्टर नोंदणी करण्यासाठी ३०० रूपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी दुय्यम निबंधकासह एका खाजगी पंटरला लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली़
१८ रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास येथील दुय्यम निबंधक कार्यालयात लाचलुचपत विभागाच्या धुळे पथकाने दुय्यम निबंधकासह एका खाजगी पंटरला ३०० रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली़
नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक श्रेणी १ येथील कार्यालयातील दुय्यम निबंधक अरुण संभाजी कापडणे (५४) रा़जत्रा हॉटेलजवळ, कोणार्क नगर मनोमय ड्रीम होम नाशिक व खाजगी इसम सुनिल उर्फ छोटू पंडीत बाविस्कर (४३) रा़वाघाडी ता़शिरपूर यांनी तक्रारदार वकील हे त्यांच्याकडील पक्षकाराचे खरेदीखत रजिस्टर नोंदणी करावयाची असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तुर या नात्याने नोंदणी करीता गेलेत़ त्यावेळी त्यांच्याकडून दस्त नोंदणीचे बदल्यात ४०० रूपयांची लाचेची मागणी केली़ त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली असता तडजोडी अंती ३०० रूपयांची लाच घेतांना दोघांना ताब्यात घेण्यात आले़
सदर कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, पोलिस उपअधिक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळ्याचे सापळा अधिकारी मंजितसिंग चव्हाण, सहा.सापळा अधिकारी प्रकाश झोडगे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, संदीप सरग, भुषण खलानेकर, भूषण शेटे यांच्या पथकाने ही कारवाई केली़