दोंडाईचा सपोनि पंजाबराव राठोड यांची तडकाफडकी नियंत्रणात कक्षात बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 13:45 IST2020-10-09T13:44:44+5:302020-10-09T13:45:09+5:30
मोहन मराठे संशयास्पद मृत्यू प्रकरण : पोलीस अधीक्षकांची माहिती

दोंडाईचा सपोनि पंजाबराव राठोड यांची तडकाफडकी नियंत्रणात कक्षात बदली
धुळे : दोंडाईचा येथे बुधवारी झालेल्या मोहन मराठे (३७) या तरुणाच्या संशयास्पद मृत्यूूमुळे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत़ गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़ याच अनुषंगाने दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे़ तर, त्यांच्या जागी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली़ दरम्यान, मोहन मराठे याच्यावर धुळ्यात सकाळी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे़ त्याचा प्राथमिक अहवाल हा गोपनीय ठेवण्यात आलेला आहे़