धुळ्यात मास्क न घालणाऱ्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडाची नामुष्की!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 22:04 IST2021-03-05T22:04:17+5:302021-03-05T22:04:38+5:30
पोलीस मुख्यालयाजवळ कारवाई : मोहीम सुरुच राहण्याचे संकेत

धुळ्यात मास्क न घालणाऱ्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडाची नामुष्की!
धुळे - विनामास्क फिरणाºयांवर महापालिका आणि पोलीस विभागाकडून कारवाई केली जात आहे़ बसस्थानकासमोरील पोलीस मुख्यालयाजवळ विनामास्क फिरणाºया ८ पोलीस कर्मचाºयांना उपअधीक्षक प्रदीप पाडवी, शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पकडले़ सर्वसामान्य नागरीकांप्रमाणे त्यांच्याकडून सुध्दा २०० रुपये दंडाची पावती रितसर फाडण्यात आली़ दरम्यान, पोलीस पोलिसांना सोडत नसल्याने आता तरी सामान्य लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे़
शहरात सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसून येत आहे़ त्या अनुषंगाने प्रशासनाने नागरीकांना मास्क व सॅनिटायझर वापरणेबाबत निर्बंध लावलेले आहेत़ तरीही काही नागरीकांकडून मोठ्या प्रमाणावर निर्बंधाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ शहर व परिसरात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी विनामास्क फिरुन नियमभंग करीत असल्याचे निदर्शनास येत होते़ त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी अशा पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत कारवाई करण्याचे आदेश केले होते़ प्रभारी उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, कर्मचारी भिला पाटील, संदिप पाटील, मुख्तार मन्सुरी, सचिन साळूंखे, प्रसाद वाघ, नरेंद्र परदेशी, सोनवणे यांनी पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबून विनामास्क लावणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली़ त्यात ८ पोलीस कर्मचारी सापडले़ त्यांच्यावर देखील प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली़ त्यांना सन्मानपुर्वक नवीन मास्क देवून त्यांना योग्य अशी समज देण्यात आली़ त्यानंतर ही मोहीम जिल्हा न्यायालय परिसर, तहसील कार्यालय परिसर या ठिकाणी जावून विनामास्क फिरणाºयांना पकडून दंड ठोठावण्यात आला़