नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 12:13 IST2020-02-25T12:13:39+5:302020-02-25T12:13:58+5:30
आम आदमी पार्टी : जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयांच्या बाहेर लावा अशी मागणी आम आदमी पार्टी शेतकरी संघर्ष समितीच्या धुळे जिल्हा शाखेने केली आहे़
शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी सोमवारी उप जिल्हाधिकारी महसूल यांना निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, सतत तीन वर्षे दुष्काळ आणि त्यानंतर यंदा झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे़ त्यामुळे शेतकºयांना विमा कंपन्यांकडून त्वरीत नुकसान भरपाई मिळावी़ अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांची यादी ग्रामपंचाय आणि तलाठी कार्यालयाच्या बाहेर लावावी अशा सात प्रमुख मागण्या निवेदनरात करण्यात आल्या आहेत़
शेतकºयांनी प्रथम क्युमाईन क्लब जवळ एक दिवसीय धरणे आंदोलन केले़
निवेदनावर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ईश्वर उखा पाटील, रयत क्रांती शेतकरी सघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदिश गुलाबराव नेरकर, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा कापडणे गणाचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील, भिकन यशवंत पवार, देविदास तुकाराम, अशोक पाटील, जयदिप मराठे, शरद मंगा पाटील, किशोर भटू पाटील, युवराज मोतीराम पाटील यांच्या सह्या आहेत़