लोकसेवा आयोगाची आज २३ केंद्रावर परीक्षा २३ केंद्रावर पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST2021-09-04T04:42:37+5:302021-09-04T04:42:37+5:30
(पूर्व) होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या आवारापासून शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपावेतो मनाई आदेश लागू राहतील, ...

लोकसेवा आयोगाची आज २३ केंद्रावर परीक्षा २३ केंद्रावर पूर्व परीक्षा
(पूर्व) होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या आवारापासून शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपावेतो
मनाई आदेश लागू राहतील, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तृप्ती धोडमिसे,धुळे यांनी कळविले आहे. दरम्यान जिल्ह्यात परीक्षेसाठी ७ हजार ७५२ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले आहेत.
परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात कुणीही गर्दी, गोंधळ निर्माण करु नये या उद्देशाने व परीक्षा सुरळीत पार पाडणेच्या दृष्टीने मनाई आदेश जारी केले आहेत. परीक्षा केंद्राचे २०० मीटर परिसरात परीक्षार्थीशिवाय इतर कोणासही प्रवेश असणार नाही. कोणतेही शस्त्र बाळगता येणार नाही. परीक्षार्थींना मोबाईल, पेजर, गणकयंत्र आदींचा वापर सदर परीक्षा केंद्राच्या परिसरात करता येणार नाही.
परीक्षा केंद्र व कंसात परीक्षार्थींची संख्या अशी
-कमलाबाई शंकरलाल कन्या हायस्कूल, (भाग- अ, ३१२.) कमलाबाई शाळा भाग- ब २८८. जे. आर. सिटी हायस्कूल, ३१२. जे. आर. सिटी हायस्कूल (२८८). छत्रपती शिवाजी हायस्कूल, (४३२) जिजामाता कन्या विद्यालय,(५०४), के. एस. के. न्यू सिटी हायस्कूल, भाग-(२८८), के. एस. के. न्यू सिटी हायस्कूल,(२८८), आर. आर. नूतन पाडवी हायस्कूल, (२८८) अँग्लो उर्दू हायस्कूल, (२४०), छत्रपती अग्रसेनजी महाराज माध्यमिक विद्यालय,(३६०) कनोसा कॉन्व्हेन्ट हायस्कूल, (४८०), दुधेडिया हायस्कूल, (३१२), नॅशनल उर्दू हायस्कूल, (३१२), नॅशनल उर्दू हायस्कूल, (२८८), उन्नती माध्यमिक विद्यालय, (२४०), महाराणा प्रताप हायस्कूल, (४०८), टी. टी. खलाणे महाजन हायस्कूल, (२८८),. एकवीरा देवी माध्यमिक विद्यालय,(३६०), जयहिंद हायस्कूल, (३६०), जयहिंद हायस्कूल, एल. एम. सरदार हायस्कूल(५०४),डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, (२४०).