शिरपुरात व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर जनता कर्फ्यूला बसला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 22:08 IST2020-06-17T22:07:46+5:302020-06-17T22:08:37+5:30

पालिकेत मुख्याधिकारी अमोल बागुल यांची भेट

Public curfew breaks after protests by traders in Shirpur | शिरपुरात व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर जनता कर्फ्यूला बसला ब्रेक

dhule

शिरपूर : शहरात १७ ते २१ दरम्यान पाच दिवसांचा सर्वपक्षीय जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला होता. परंतू शहरातील व्यापाऱ्यांनी त्याला विरोध करीत आपले व्यवहार सुरु ठेवणार असल्याची भूमिका घेतली. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन दिले. तेव्हा मुख्याधिकाºयांनी हा निर्णय सर्वपक्षीय आहे. त्यात आमचा सहभाग नाही. त्यामुळे व्यापारी प्रतिष्ठान खुल्या ठेवणाºयाविरोधात कुठली कारवाई करण्यात येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर व्यापाºयांनी जनता कर्फ्यू रद्द झाला असल्याचे जाहीर करुन आपली व्यवहार सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी १७ ते २१ जून असे ५ दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करण्याचे जाहिर केले होते. तसेच संदेश सोमवारी रात्रीपासून सोशल मिडियावर सर्वच ग्रुपवर पसरले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच याच्याविरोधात व्यापाºयांचा विरोध सुरु होता. सर्वच व्यापारी यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदन देण्यासाठी दुपारी शिष्टमंडळासह गेले. पालिकेत मुख्याधिकारी अमोल बागुल यांची भेट घेऊन व्यापाºयांनी त्यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अर्थचक्र सावरण्यासाठी लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय घेतला आहे़ ८० दिवसाच्या लॉकडाऊननंंतर शहरात कुठेतरी उभा राहीला आहे. लोक आता खरेदीसाठी बाहेर येऊ लागलेत़ संपूर्ण भारतात सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र ते वगळता शहरात सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत या मर्यादित कालावधीतच बाजारपेठ व दुकाने सुरु असतात. सलग दुसºयांंदा जनता कर्फ्यू या गोंडस नावाखाली व्यवहार व बाजारपेठ बेकायदेशीरपणे बंद करणे म्हणजे सर्वसामान्य गरजुंच्या पोटावर पाय देणे आहे. यापूर्वी शहराची बाजारपेठ बंद असल्यामुळे शासनाचे, शेतकरी बांधवाचे शेती पुरक, कामगार व व्यापाºयांचे जवळपास २ हजार कोटीची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे़ जनता कर्फ्यूच्या निर्णयाला व्यापाºयांसह शहरातील सर्व घटकांतून असलेल्या विरोधाचे प्रमाण लक्षात घेता तो बहुतेक जनतेला नामंजूर असल्याचे दिसून येते. सोशल मिडियावर निनावी आव्हान करून बंद करण्याची घोषणा करणे संतापजनक आहे. त्यामुळे या लादलेल्या बंदला व्यापारांचा विरोध आहे. व्यापाºयांनी शिरपूर बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून ज्या-ज्या लिखित सुचना आहे. त्याचे काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यास आम्ही बांधील आहोत असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मराठा व्यापारी संघटना, किराणा व्यापारी असोसिएशन, सिडस् अ‍ॅण्ड पेस्टीसाईड असोसिएशन, गांधी मार्केट, शिवाजी मार्केट, धाना बाजार, सिंधी मार्केट, नेहरू रोड परिसरातील व्यापाºयांच्या स्वाक्षºया आहेत़
पालिकेचे आश्वासन
हा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय आहे. हा पालिका प्रशासनाचा निर्णय नाही. त्यामुळे या जनता कर्फ्यूमध्ये कोणाला सहभागी व्हायचे ते त्याने ठरवावे. आम्ही कोणावरही कारवाई करणार असे आश्वासन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी दिले. त्यानंतर व्यापाºयांनी आपले व्यवसाय सुरु ठेवण्याचे ठरविले आहे.

Web Title: Public curfew breaks after protests by traders in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे