साक्रीरोडवरील मच्छीमार व्यावसायिकांना जागा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 22:53 IST2020-02-02T22:52:57+5:302020-02-02T22:53:11+5:30
महापालिका । व्यावसायिकांचे सामुहिक निदर्शने

Dhule
धुळे : साक्रीरोड परिसरातील मोगलाई भागात पन्नास वर्षांपासून मासे विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. व्यावसायिक परिसरात स्वच्छताही ठेवतात. त्यानंतरही या भागातील काही नागरिक मासे विक्रेत्यांना त्रास देतात़ त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली़
पन्नास वर्षांपासून साक्रीरोड भागातील मोगलाई येथे मासे विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. मात्र, परिसरातील रहिवासी विक्रेत्यांना विनाकारण शिवीगाळ करतात. त्यांच्या जागेवर खरकटे पाणी टाकतात. विनाकारण तक्रार अर्ज करतात. परिसरातील अण्णा जगताप, उमा जगताप, भूपेंद्र जगताप, योगिता जगताप, नरेंद्र जगताप, चारुशीला जगताप आदींकडून हा प्रकार केला जात नाही.
याप्रकरणी योग्य कारवाई करावी अशी मागणी मोहन जगताप, माजी नगरसेवक राजू पटाईत, राजू सय्यद, दिनकर कदम, स्वप्निल जगताप, लक्ष्मीबाई जगताप, मनोज जगताप, जगदीश प्रजापत, अशोक सोनवणे, सुरेश सोनवणे, मोतीलाल चौधी, पीतांबर तमखाने, बापू तमखाने, जितेंद्र मोरे, पंडित मोरे, रवींद्र मोरे, राजेंद्र चौधरी, मुकेश चौधरी, काळू चौधरी, अशफाक खाटीक, दीपक कांबळे, बाला मोरे, गणेश मोरे, राणीबाई सोनवणे, कमलाबाई मोरे, रत्ना पवार, मंगला पवार, विजया मोरे, बानू भील आदींनी केली़ मनपा प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे़