लॉकडाऊनमुळे बेरोजगार वाहनचालकांना आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:42 IST2020-08-05T21:41:44+5:302020-08-05T21:42:02+5:30
भारतीय ट्रेड युनियन : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

dhule
धुळे : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगार होवून आर्थिक संकटात सापडलेल्या वाहन चालकांना आर्थिक मदत द्यावी तसेच सामाजिक सुरक्षेचा लाभ द्यावा, अशी मागणी भारतीय ट्रेड युनियनने केली आहे़
ट्रेड युनियनचे कॉ़ एल़ आऱ राव, आयटकचे कॉ़ पोपटराव चौधरी, इंटकचे प्रमोद सिसोदे, कॉ़ दिपक सोनवणे, कॉ़ प्रशांत वाणी, विशाल पाटील आदींच्या शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे़
निवेदनात म्हटले आहे की, मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प आहे़ तसेच अनलॉकमध्ये देखील वाहतूक सेवेवर अनेक प्रकारचे निर्बंध आहेत़ त्यामुळे वाहनचालक आर्थिक संकटात सापडले आहेत़ टॅक्सी, रिक्षा या वाहनांची संख्या १२ लाखांच्या वर आहे़ तसेच या व्यवसायात काम करणाºया कामगारांची संख्या देखील १८ ते २० लाखांपर्यंत आहे़ कोवीड १९ च्या महामारीत स्वयंरोजगार करणारा वाहनचालक पूर्णपणे भरडून निघाला आहे़ गेल्या चार महिन्यांपासून व्यवसाय ठप्प आहे़ वाहन खरेदीकरीता घेतलेल्या कर्जाचे व्याज दिवसेंदिवस वाढत आहे़ कर्जाच्या वसुलीपोटी वित्तीय संस्थांचा तगादा सुरू आहे़ कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा कराव या विवंचनेत हा घटक आहे़ त्यामुळे राज्यातील टॅक्सी, रिक्षा, स्कूल बस, टेम्पो, ट्रॉली चालकांना १० हजार रुपये अनुदान द्यावे व लॉकडाऊन कालावधीचे प्रतिमहा साडेसात हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी आहे़